Homeमहत्त्वाचेदौंड बस स्थानकावर सवलतधारकांसाठी 'NCMC' स्मार्ट कार्डच्या योजनेला सुरुवात

दौंड बस स्थानकावर सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्डच्या योजनेला सुरुवात

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड — एसटी महामंडळाने व्यवहारात पारदर्शकता यावी आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी म्हणून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळांतर्गत महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, ६५ ते ७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपेक्षा पुढील ज्येष्ठांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत विनाशुल्क प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के दरात मासिक पास योजना, बारावीपर्यंत मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास, शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट पास वितरण, स्वातंत्र्य सैनिक आणि एक साथीदार, मोफत प्रवास, मासिक, त्रैमासिक पासधारकांना ५० टक्के सवलत, त्याचा लाभ घेऊ इच्छिणारे प्रवासी यांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

परंपरागत प्रवासी व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा हा टप्पा आहे. तिकिटासाठी सुट्या पैशांची कमतरता, पैशांची टंचाई किंवा या गोष्टी एनसीएमसी कार्डमुळे इतिहासजमा होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता निर्माण होणार असून प्रवाशांना सुलभ, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. या योजनेचा लाभ सर्व सवलतधारी प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन शिवाजी कानडे, आगार व्यवस्थापक दौंड यांनी केले यावेळी, स्थानक प्रमुख प्रतीक अनाके, वाहतुक नियंत्रक गणेश शेलार, सदाशिव गोरे, ईबीक्स इंजीनीयर गणेश गायकवाड, दत्तात्रय तिगोटे, मुनीर शेख, अविनाश पाळेकर व प्रवाशी बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध योजनांतील सवलतधारक किंवा योजनेअंतर्गत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी यापुढे ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!