Homeराजकीयदौंड नगरपरिषदेवर महिला राज | महिला नेतृत्वाला संधी; छाया दिपक थोरात उपनगराध्यक्षपदी...

दौंड नगरपरिषदेवर महिला राज | महिला नेतृत्वाला संधी; छाया दिपक थोरात उपनगराध्यक्षपदी निवड

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नागरिक हित संरक्षण मंडळ, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले साहेब गट) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे साहेब गट) यांच्या विकास आघाडीच्या नगरसेविका छाया दिपक थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दौंड नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने छाया दिपक थोरात यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सभागृहात उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी व समर्थकांनी स्वागत केले.

निवडीनंतर बोलताना उपनगराध्यक्ष छाया थोरात यांनी सांगितले की, दौंड शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच महिला व युवकांसाठीच्या विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल. सर्व पक्षांच्या सहकार्याने व समन्वयाने दौंड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या या निवडीमुळे विकास आघाडी अधिक बळकट झाली असून आगामी काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून शहर विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!