Homeमहत्त्वाचेदौंड नगरपरिषदेला १.३० कोटींची अत्याधुनिक वाहने; स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापनाला मिळणार बळ

दौंड नगरपरिषदेला १.३० कोटींची अत्याधुनिक वाहने; स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापनाला मिळणार बळ

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत दौंड नगरपरिषदेला सुमारे ४० लाख किमतीची अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीन आणि अग्निशामक वाहन उपलब्ध झाले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुमारे ९० लाख किमतीची दोन गुरखा वाहने व दोन बुलेट मोटारसायकली नगरपरिषदेला प्राप्त झाल्या असून, या वाहनांचे पूजन नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे, उपनगराध्यक्षा छाया थोरात आणि आरोग्य सभापती कार्तिकी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

अत्याधुनिक सक्शन-कम-जेटिंग मशीनच्या माध्यमातून शहरातील सांडपाणी वाहिन्या, गटारी आणि चेंबरमधील गाळ काढणे, जेटिंगद्वारे अडथळे दूर करणे तसेच मड पंपाच्या साहाय्याने प्रभावी सक्शन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे शहरातील ड्रेनेज आणि सांडपाणी व्यवस्थेच्या तक्रारींचे जलद निवारण होऊन स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त झालेली दोन गुरखा वाहने आणि दोन बुलेट मोटारसायकली शहरातील आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. या वाहनांमुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होऊन नागरिकांना जलद व प्रभावी सेवा देणे शक्य होणार आहे.

यावेळी नागरी हित संरक्षण मंडळाचे गटनेते योगेश कटारिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जिवराज पवार, सर्व नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी अवधूत तावडे, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी शहराच्या स्वच्छता, सुरक्षितता आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही वाहने अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. नागरिकांना अधिक सक्षम आणि तत्पर नागरी सेवा देण्यासाठी दौंड नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील नगरपरिषदांना विविध योजनांद्वारे भरीव निधी व अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!