वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहर व परिसरात वाढत्या तापमानाचा आणि प्रदूषणाचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या पुढाकारातून भव्य ‘वृक्षदान अभियान’ सुरू करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण, हरित शहर निर्मिती आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध प्राणवायू उपलब्ध राहावा या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.
एक झाड दान करा… भविष्यासाठी प्राणवायू जतन करा! या घोषवाक्याखाली सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सध्या जगभरात वाढत चाललेल्या तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतातील अनेक शहरे उष्णतेच्या तीव्र लाटांना सामोरे जात आहेत. यावर उपाय म्हणून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन हाच प्रभावी मार्ग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
या अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दान करून पर्यावरण संवर्धनात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. झाडांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी होऊन प्राणवायूचे प्रमाण वाढते, पावसाचे पाणी जमिनीत मुरते, भूजल पातळी वाढण्यास मदत होते तसेच परिसरातील तापमानात लक्षणीय घट होते. परिणामी नागरिकांचे आरोग्य सुधारते आणि जीवनमान उंचावते.
श्वास संस्था व विविध पर्यावरणप्रेमी संघटनांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येत असून, नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर दिला जात आहे. “आजचे वृक्षदान, उद्याचे जीवनदान” आणि “तापमान वाढीवर एकच उपाय — झाडे लावा, झाडे जगवा” अशा संदेशांद्वारे नागरिकांना प्रेरित केले जात आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून “हरित पृथ्वी – सुरक्षित भविष्य” या संकल्पनेची अंमलबजावणी करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शेवटी, “एक झाड लावा, अनेकांचे जीवन वाचवा” या संदेशासह नागरिकांनी पुढाकार घेऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन नगरसेवक रोहित पाटील यांनी केले आहे.
📞 वृक्षदानासाठी संपर्क
रोहित पाटील – 9767234234
जे. पी. सर – 9822607040
माधव बागल सर – 9423207869
अमोल जगताप – 7059777711
रोहित त्रिभुवन – 8308004330
अनिस पठाण – 9797050505
निखिल मुलचंदाणी – 7028400234
रुपेश क्षीरसागर – 9764747471
गणेश गाठे – 9890335511

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























