Homeसामाजिकदौंडमध्ये संतापाची लाट: दिवंगत फादर जोव्हियन डिमेलो यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टविरोधात तक्रार

दौंडमध्ये संतापाची लाट: दिवंगत फादर जोव्हियन डिमेलो यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टविरोधात तक्रार

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दिवंगत प्राचार्य रेव्ह. फादर जोव्हियन डिमेलो यांच्याविषयी सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे दौंड शहरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. नहूम शिंदे नावाच्या व्यक्तीने केलेल्या या पोस्टमुळे दौंड शहरातील नागरिक, माजी विद्यार्थी, पालकवर्ग तसेच ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

फादर जोव्हियन डिमेलो यांनी आपल्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. सेंट सेबेस्टियन स्कूलचे प्राचार्य म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवले. त्यांच्या निधनानंतर अशा प्रकारचा अवमानकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर पोस्टमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, पोलिस प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी होत आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पुढील २४ तासांत कारवाई न झाल्यास दौंड शहरातील नागरिक, सेंट सेबेस्टियन स्कूलचे माजी व विद्यमान विद्यार्थी, पालकवर्ग आणि हितचिंतक यांच्यावतीने शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलिस प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!