वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या श्रीराम नवमी उत्सवाच्या आयोजनासाठी यावर्षी उत्सव समितीची नुकतीच बैठक विठ्ठल मंदिर येथे पार पडली. यावेळी श्रीराम नवमी उत्सव समितीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. सन २०२६ साठी समितीच्या अध्यक्षपदी अक्षय घोलप यांची एकमताने निवड करण्यात आली. यावर्षी रामनवमी गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी साजरी होत असून उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
उत्सव यशस्वी आणि भव्य करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. समितीच्या उपाध्यक्षपदी अक्षय वाघमारे, नेहाल वाल्मिकी यांची निवड करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी आनंद मनोत आणि सुभाष गायकवाड यांच्यावर आर्थिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
समितीच्या सचिवपदी राहुल मदने आणि ओंकार घोलप यांची निवड करण्यात आली असून ते उत्सवाचे नियोजन व कार्यक्रमांचे समन्वय साधणार आहेत. तसेच व्यवस्थापकपदी श्रेयस कदम आणि अविनाश जाधव यांची निवड करण्यात आली असून उत्सवाच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी ते पार पाडणार आहेत.
यावर्षी श्रीराम नवमीच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रम, श्रीराम जन्मोत्सव सोहळा तसेच श्रीरामांची भव्य मिरवणुक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
दौंड शहरातील भाविक आणि नागरिकांच्या सहभागातून हा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा समितीचा मानस असून त्यासाठी नियोजनाची तयारी सुरू झाली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















