वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरामध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. आलमगिर मशिदीचे मौलाना अस्लम रझा शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. सकाळपासूनच शहरात ईदच्या शुभेच्छांचा माहोल दिसून येत होता.
दौंड शहरातील ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहून सामूहिक नमाज अदा केली. नमाजानंतर मौलाना अस्लम रझा शेख यांनी देशात शांतता आणि भाईचारा अबाधित राहावा यासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना केली.
समाजात एकता आणि प्रेम टिकून राहावे, तसेच सर्वांनी एकमेकांबद्दल आदर आणि सहकार्याची भावना ठेवावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे पाटील, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नगरसेवक इंद्रजीत जगदाळे तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नगरपालिकेचे नगरसेवक यांची उपस्थिती लक्षणीय होती.
ईदच्या निमित्ताने दौंड शहरात ठिकठिकाणी एकमेकांना भेटून रमजान ईद च्या शुभेच्छा देण्याचा आनंददायी दृश्य पाहायला मिळाले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
एकूणच, दौंड शहरात रमजान ईद शांतता, एकता आणि भाईचाऱ्याचा संदेश देत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























