Homeशहरदौंडमध्ये भगवान महावीर स्वामी जयंती उत्साहात; भव्य मिरवणुकीने दौंडकरांचे वेधले लक्ष

दौंडमध्ये भगवान महावीर स्वामी जयंती उत्साहात; भव्य मिरवणुकीने दौंडकरांचे वेधले लक्ष

वृत्तवेध मarathi  / संदिप बारटक्के

दौंड : शहरात भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक (महावीर जयंती) मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने दौंड शहरातून भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली.

महावीर स्वामी यांच्या मिरवणुकीची सुरुवात दौंड शहरातील श्री विमल पार्श्वनाथ मंदिर येथून करण्यात आली. यावेळी दौंड स्थानकवाशी श्रावक संघाचे संघपती शांतीलाल मुनोत, श्री पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिराचे संघपती घीसुलाल जैन, तसेच श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष सुशील शहा यांच्यासह मोठ्या संख्येने जैन बांधव सहभागी झाले होते.

मिरवणुकीत रथावर भगवान महावीर यांची आकर्षक प्रतिमा ठेवण्यात आली होती. तसेच घोड्यावर स्वार असलेले बालक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. शहरातील विविध ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी “शुद्ध आहार, शाकाहार”, “जगा आणि जगू द्या” यांसारख्या प्रबोधनात्मक घोषणा देत समाजप्रबोधन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, उपनगराध्यक्षा छाया थोरात, तसेच अनेक मान्यवरांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भगवान महावीर जयंती निमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. तसेच दौंड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!