Homeराजकीयदौंडमध्ये 'दुर्गाराज' सुरू | नव्या विचारांचा नगराध्यक्ष : दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळेंनी दिला...

दौंडमध्ये ‘दुर्गाराज’ सुरू | नव्या विचारांचा नगराध्यक्ष : दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळेंनी दिला विकासाचा शब्द

वृत्तवेध मarathi /संदिप बारटक्के 

दौंड शहराच्या इतिहासात एक नवा अध्याय आज लिहिला गेला. अवघ्या तेवीस वर्षांच्या तरुण कुमारी दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत सूत्रे हाती घेतली, आणि त्या दौंडच्या इतिहासातील सर्वांत तरुण नगराध्यक्ष ठरल्या. त्यांच्या या ऐतिहासिक निवडीमुळे शहरात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्ष पदभार स्वीकारताना दौंड शहरात ढोल–ताशांच्या गजरात आणि जल्लोषात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नागरिक, कार्यकर्ते, युवक–युवती आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला आनंद व्यक्त केला. फुलांची उधळण, घोषणाबाजी आणि शुभेच्छांच्या वर्षावात संपूर्ण शहर आनंदोत्सवात न्हाऊन निघाले होते.

दौंड नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या अधिकृत कार्यक्रमात नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांनी संविधानाची शपथ घेऊन आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नगरपरिषदेमधील महिला कर्मचाऱ्यांनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या, तर उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी तरुण नेतृत्वामुळे दौंडच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना व्यक्त केली.

यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,

“दौंड शहराने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही. दौंड शहराचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांसाठी विशेष योजना राबविण्यावर भर देणार आहे. मात्र या सर्व विकासकामांसाठी दौंडकरांनी ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहावे.”

त्यांच्या या निर्धारपूर्ण भूमिकेमुळे शहरातील नागरिकांमध्ये नव्या अपेक्षा निर्माण झाल्या असून, तरुण नेतृत्वाच्या माध्यमातून दौंड शहराचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!