Homeराजकीयदौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांची पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या सरचिटणीसपदी निवड;...

दौंडच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांची पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या सरचिटणीसपदी निवड; शहरातून अभिनंदनाचा वर्षाव

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे दौंड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून शहरातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

नगराध्यक्षा म्हणून कार्यरत असताना दुर्गादेवी जगदाळे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, नागरिकांच्या मूलभूत सुविधा तसेच लोकाभिमुख प्रशासन यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीची आणि नेतृत्वगुणांची दखल घेत महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाने त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या सरचिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

या पदाच्या माध्यमातून त्यांना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील नगरपालिकांच्या विविध समस्या व प्रश्न शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, नागरी विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नगरपालिकांमधील समन्वय वाढविण्यासाठीही त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दुर्गादेवी जगदाळे यांच्या निवडीमुळे दौंड शहराचा राज्यस्तरावर गौरव वाढला असून ही निवड शहरासाठी अभिमानास्पद मानली जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या दुर्गादेवी जगदाळे यांच्या या नव्या जबाबदारीमुळे दौंडसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील नगरपालिकांच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!