Homeसामाजिकदौंडचा मान उंचावला! रोटरॅक्ट क्लबचे दोन तरुण जिल्हा पातळीवर झळकले

दौंडचा मान उंचावला! रोटरॅक्ट क्लबचे दोन तरुण जिल्हा पातळीवर झळकले

वृत्तवेध मarathi/ संदिप बारटक्के

दौंड : रोटरॅक्ट चळवळीतील उल्लेखनीय कार्याच्या जोरावर रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेजचे रोटरॅक्टर प्रज्वल बांडे आणि प्रेम बनसोडे यांनी पुन्हा एकदा दौंडचे नाव उज्वल केले आहे. रोटरी इंटरनॅशनल वर्ष २०२६-२७ साठी डिस्ट्रिक्ट ३१३१ (पुणे) मध्ये त्यांची महत्त्वाच्या पदांवर निवड जाहीर झाली आहे.

प्रज्वल बांडे यांची डिस्ट्रिक्ट ऑफिसर – इंटरॅक्ट रोटरॅक्ट रिलेशन (Elect) म्हणून तर प्रेम बनसोडे यांची डिस्ट्रिक्ट झोनल रिप्रेझेंटेटिव्ह (Elect) म्हणून निवड करण्यात आली आहे.

दोघेही यापूर्वी रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड कॉलेजचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आले होते.

त्यांच्या कार्याची दखल घेत नवनिर्वाचित डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह (Elect) डॉ. करिष्मा आवरी यांनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
विशेष म्हणजे, दौंड क्लबमधून प्रथमच दोन सदस्यांना जिल्हा कौन्सिलमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने क्लब सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या निवडीमुळे दौंडमधील तरुणांना सामाजिक कार्यात पुढे येण्यासाठी नवी प्रेरणा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!