Homeमहत्त्वाचेदौंडकरांसाठी अभिमानाचा क्षण! नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांच्या हस्ते पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा...

दौंडकरांसाठी अभिमानाचा क्षण! नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांच्या हस्ते पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड शहरासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरलेल्या पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेचा आज शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्थानकावर नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या नव्या सेवेचे स्वागत करण्यात आले.

पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी या महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ही रेल्वे सेवा लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. या सेवेच्या प्रारंभामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

शुभारंभ प्रसंगी बोलताना नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी रेल्वे प्रशासनाचे अभिनंदन करत ही सेवा दौंडसह परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच दौंड रेल्वे स्थानकावरील सुविधा वाढविणे, प्रवाशांसाठी अधिक सोयी उपलब्ध करून देणे आणि शहराच्या रेल्वे विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा छाया थोरात, शहरातील नगरसेवक-नगरसेविका, विविध लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी, विद्यार्थी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रेल्वे सेवेच्या शुभारंभाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.

पुणे–साईनगर शिर्डी एक्सप्रेसच्या प्रारंभामुळे दौंड शहराची राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक आणि व्यापारी केंद्रांशी जोडणी अधिक मजबूत होणार आहे. यामुळे प्रवास सुलभ होण्याबरोबरच व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि धार्मिक क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या ऐतिहासिक रेल्वे सेवेच्या शुभारंभामुळे दौंड शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असून नागरिकांमध्ये उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

3 अटक, पुणे ग्रामीण पोलिसांनी 20 गुन्हे उघडकीस आणले

पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोड्या, दरोडे आणि दरोड्याचे 20 गुन्हे उघडकीस आणून अटक केली, तर आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोटारसायकल असा २५ लाखांचा...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर एमबीबीएस; कु. नेहा रामचंद्र सोनोने यांचा नगरसेविका स्वाती सावंत...

  वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के दौंड | वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या संपादन करून कुटुंबासह दौंड शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु....

सेना (UBT) दोन खासदारांना मागे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे

सेनेचे (UBT) आमदार अंबादास दानवे आणि आमदार कैलास पाटील यांना उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्याशी संपर्क...

FYJC साठी 15L पेक्षा जास्त जागा, 23 जून रोजी तिसरी गुणवत्ता यादी

पुणे : यावर्षी FYJC साठी दुसरी नियमित प्रवेश फेरी पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 15,71,662 जागा रिक्त आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या...

मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोसायट्या, मतदान अधिकारी बांधील

पुणे : बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) ला रहिवाशांपर्यंत पोहोचण्यास आणि या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या मतदार यादीच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) मध्ये...

error: Content is protected !!