Homeशहरजागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा गौरव; स्वसंरक्षण प्रशिक्षणासह प्रेरणादायी कार्यक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा गौरव; स्वसंरक्षण प्रशिक्षणासह प्रेरणादायी कार्यक्रम

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड — जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्वर्गीय सौ. रोहिणी शशिकांत भालेराव यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आला.
या वेळी श्रीमती सुभद्रा लोटके, श्रीमती गंगाबाई विंचुरकर, श्रीमती रंजना वाकसे, सौ. सुनीता पलंगे, सौ. शोभा पळसकर व सौ. सुमन बाबर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मान स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान आणि अभिमान पाहून उपस्थितांनाही समाजासाठी उपयुक्त कार्य केल्याची भावना अनुभवायला मिळाली.

तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यमान महिला नगरसेविकांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. माजी नगराध्यक्ष शीतलताई कटारिया, विद्यमान उपनगराध्यक्षा छायाताई थोरात, नगरसेविका रुचिताताई कटारिया, ज्योतीताई राऊत, अमिराताई पानसरे, रेणुकाताई थोरात, वैशालीताई मासाळकर, उज्वलाताई परकाळे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सरिताताई कुल यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय बी.ई. सोसायटी इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका राजश्री पाटील, ओम नर्सरी स्कूलच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई गौडेलर आणि लर्न अँड प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वाती मोठे यांचाही सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सेल्फ डिफेन्सचे धडे देण्यात आले. कमी वेळात महिलांनी स्वसंरक्षणाच्या काही महत्त्वाच्या तंत्रांचे शिक्षण घेतले आणि त्या उत्साही व आनंदी झाल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन वैशाली संतोष सोनवणे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी शुभांगी सोनवणे, स्नेहल साळवे, विद्या पोकार, सिद्धी लोटके व स्वरा सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले. महिलांच्या सन्मानाचा आणि सशक्तीकरणाचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!