वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहरात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम उत्साहात पार पडले. या उपक्रमातून समाजसेवेचा संदेश देत भाजप कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वच्छता आणि अभिवादनाचा आदर्श घालून दिला.
दौंडचे आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा जिल्हाध्यक्ष शेखर वडणे आणि दौंड शहर अध्यक्ष रितेश ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यक्रमाला विशेष ऊर्जा आणि दिशा मिळाली.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव दाखवून दिली. स्वच्छता उपक्रमानंतर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महान समाजसुधारकाला आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात राहुल भंडारी, यश कुलथे, नागेश बेलूरकर, रवी बंड यांच्यासह दौंड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष झावरे, तसेच महिला पदाधिकारी सौ. मोनाली वीर आणि सौ. सरिता कुल यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. साधेपणातही प्रेरणादायी ठरलेला हा कार्यक्रम उपस्थितांसाठी ऊर्जा देणारा ठरला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























