Homeशहरकुरकुंभ मोरीला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ तर जलतरण तलावाला ‘विकासरत्न अजितदादा पवार’...

कुरकुंभ मोरीला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ तर जलतरण तलावाला ‘विकासरत्न अजितदादा पवार’ नामकरणाची नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची मागणी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड — शहरातील कुरकुंभ मोरी भुयारी मार्गास ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग’ तसेच दौंड नगरपरिषदेच्या जलतरण तलावास ‘विकासरत्न अजितदादा पवार जलतरण तलाव’ असे नामकरण करण्यात यावे, अशी अधिकृत मागणी दौंड नगरपालिकेच्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे द्वितीय छत्रपती असून स्वराज्य रक्षणासाठी व धर्मरक्षणासाठी त्यांनी प्राणार्पण केले. औरंगजेबाच्या अमानुष अत्याचारासमोर धर्मांतरास नकार देत त्यांनी दिलेले अतुलनीय बलिदान हे भारतीय इतिहासातील अद्वितीय उदाहरण आहे. त्यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा व धर्माभिमानामुळे त्यांना ‘धर्मवीर’ ही उपाधी प्राप्त झाली आहे.

दौंड शहरातील कुरकुंभ मोरी हे एक प्रमुख व महत्त्वाचे ठिकाण असून, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन व सन्मान देण्यासाठी या भुयारी मार्गास ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग’ असे नामकरण करणे महत्त्वाचे आहे.असे नगरसेविका सावंत यांनी नमूद केले. तसेच, दौंड नगरपरिषदेच्या जलतरण तलावास ‘विकासरत्न अजितदादा पवार जलतरण तलाव असे नामकरण करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.

माननीय अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अर्थमंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे. दौंड शहराच्या विकासासाठी त्यांनी कुरकुंभ मोरी भुयारी मार्गासाठी निधी, दौंड सेंट्रल बिल्डिंग उभारणीसाठी निधी, विविध विकासकामांसाठी आर्थिक सहाय्य
असे मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या अलीकडील दुःखद निधनानंतर त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी स्मृती राहावी व दौंड शहराच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने जलतरण तलावास त्यांच्या नावाने नामकरण करण्यात यावे, अशी भावना नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी व्यक्त केली आहे.

अशी ही मागणी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष दुगदिवी जगदाळे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेवक प्रविण परदेशी, मराठा महासंघाचे पुणे जिल्हा सरचिटणीस बाबा पवार, मनसेचे दौंड तालुका अध्यक्ष सचिन कुलथे, शिवसेना (ठाकरे गट) नेते संतोष जगताप,शिवसेना (ठाकरे गट)शहरप्रमुख आनंद पळसे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत धनवे, खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष निलेश सावंत,भाऊ भाडवलकर, सिद्धेश कदम, राकेश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!