वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.२१) रोजी शहरातील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरूवात झाली. नगराध्यक्ष पदासाठी एकुण सहा उमेदवार रिंगणात उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळ यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली.
दौंड नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळाच्या मोनाली वीर यांचा पराभव करुन नगराध्यक्ष पदावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या दुर्गादेवी जगदाळे यांनी ४ हजार ८९१ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला.
दौंड नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने जगदाळे पाटील यांच्या तिसऱ्या पिढीचे राजकारणात आगमन झाले. दौंड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुर्गादेवी जगदाळे विजयी झाल्यानंतरचा क्षण अनुभवताना बापाचे अभिमानाने डोळे पाणावले होते. मुलीच्या नगराध्यक्षपदाच्या विजयाने बापाच्या (इंद्रजित जगदाळे) यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते.
आज याप्रसंगी विवेक पंडित यांच्या कवितेची आठवण येते,,,
श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!
हरवलेल्या नात्यागोत्यांत.. ती पोरंच शहाणी; नाती सांभाळणा-या लेकीसाठी.. बाप पाठीराख्या वानी।
वावर मोठेपणाचा सर्वत्र.. घरी साधीच रहाणी राजकारणातून समाजकारण.. ही बापाच्या विचारांची गाणी।
जाणता बाप तो.. दैदिप्यमान जिंदगानी.. मंद हसत आशिर्वाद देई.. आपुली सावली मोठी जाणी।
दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी दुर्गादेवी जगदाळे यांना विजयी करून दौंडकरांनी गावच्या पाटलांचा मान राखला तसेच २६ पैकी १७ जागेवर भाजप पुरस्कृत नागरिक हित संरक्षण मंडळाच्या उमेदवारांना निवडून देऊन कार्यक्षम आमदार यांच्या विकास कामांना न्याय दिला आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























