Homeमहत्त्वाचेमहावितरण कंपनीचे स्मार्ट मीटर म्हणजे दौंडकरांसाठी आर्थिक भुर्दंड..... स्मार्ट मीटरला वीज ग्राहकांचा...

महावितरण कंपनीचे स्मार्ट मीटर म्हणजे दौंडकरांसाठी आर्थिक भुर्दंड….. स्मार्ट मीटरला वीज ग्राहकांचा वाढता विरोध।

अख्तर काझी

दौंड: महावितरण कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर बसविल्याने विज बिल प्रमाणापेक्षा जास्त येत असल्याचा अनुभव वीज ग्राहकांना येत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यामुळे महावितरण कंपनीने ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये अशी मागणी दौंड मधील सामाजिक कार्यकर्ते तुषार कोळी यांनी केली आहे.

तुषार कोळी यांनी महावितरण कंपनी च्या दौंड येथील उपविभागीय कार्यालयाला दिलेल्या अर्जात असे नमूद केले आहे की, घरगुती वीज जोडणीवर स्मार्ट मीटर बसविण्यास आमचा विरोध असून सध्या असलेले जुने वीज मीटरच चालू ठेवावे.MERC वीज पुरवठा संहिता 2021, नियम 15 नुसार जर ग्राहकाचे सध्याचे वीज मीटर पूर्णपणे अचूक आणि चांगल्या स्थितीत कार्यरत असेल तर वीज कंपनी ग्राहकांच्या संमतीशिवाय ते मीटर बदलू शकत नाही. वीज कायदा 2003 च्या कलम 55 नुसार मीटरची अचूकता तपासण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. जर महावितरण कंपनीला ग्राहकांचे मीटर बदलायचे असेल तर त्याआधी जुन्या मीटरचे अधिकृत लॅब टेस्टिंग करून ते सदोष असल्याचा लेखी अहवाल वीज ग्राहकांना द्यावा. मीटर सदोष असल्याचा अहवाल येण्याआधीच मीटर काढणे हे नियम बाह्य आहे.

राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच ऊर्जा मंत्रालय आणि महावितरण प्रशासनाने 2026 च्या धोरणानुसार स्पष्ट केले आहे की, सर्वसामान्य घरगुती विज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची कोणतीही सक्ती केली जाणार नाही. स्मार्ट मीटर पूर्णपणे ऐच्छिक असतील असे कायदेशीर नियम असतानाही महावितरणचे कंत्राटदार ,कर्मचारी कोणत्याही पूर्व सूचने शिवाय आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा सर्व प्रकार वीज नियमन आयोगाच्या नियमांचे उल्लंघन आहे. ग्राहकांची इच्छा नसताना व वीज मीटर सुस्थितीत असतानाही कंत्राटदारांनी जबरदस्तीने मीटर बदलल्यास ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याप्रकरणी, ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच(CGRF) आणि ग्राहक न्यायालयात रीतसर दाद मागावी लागेल आणि याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील असा इशाराही अर्जातून देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!