✍️ – संदिप बारटक्के
दौंड : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मांडलेल्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, या मागणीसाठी सकल मराठा समाज, दौंड शहर व तालुका यांच्या वतीने दौंड तहसील कार्यालय तसेच दौंड पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास तसेच संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत काही बरे-वाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीने मांडण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही आणि सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी अविनाश गाठे, वैभव जठार, प्रमोद पवार, प्रवीण गोरे, आकाश गणेशकर, सचिन मोहिते, आकाश किंगरे, राहुल पवार, गणेश घोलप, ऋतिक पाचपुते, श्रीधर मांढरे, वीरेंद्र जाधव, सोमा मोरे, दादा देशमुख यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी “जय जिजाऊ, जय शिवराय”, “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















