Homeशिक्षण-प्रशिक्षणप्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजनेत बदलाची मागणी; तांदूळ कमी करून पालेभाज्या–कडधान्य वाढवावेत

प्रधानमंत्री पोषणशक्ती आहार योजनेत बदलाची मागणी; तांदूळ कमी करून पालेभाज्या–कडधान्य वाढवावेत

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के

दौंड | प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी दररोज १०० ग्रॅम आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी १५० ग्रॅम तांदूळ शिजविण्याची अट असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थी एवढा भात खात नसल्याची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर तांदळाचे प्रमाण निम्म्याने कमी करून त्यामध्ये पालेभाज्या व विविध कडधान्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे, तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक आहारात वाढ करण्यात यावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. यासाठी कोणतीही अतिरिक्त आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता नसून, तांदळाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी पौष्टिक घटकांचा समावेश वाढविणे शक्य असल्याचे पत्रात म्हटले आहे.

ही योजना अधिक प्रभावी व विद्यार्थीकेंद्रीत पद्धतीने राबविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेमार्फत अंमलबजावणी करावी तसेच ‘मध्यवर्ती स्वयंपाकगृह योजना’ सुरू करून दर्जेदार व संतुलित आहार पुरविण्याची व्यवस्था करावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गौतम कांबळे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथील संचालकांना दिलेल्या पत्रातून ही मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्ट्या सर्वांगीण विकासासाठी आहारामध्ये पोषणमूल्यांना प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

चार महा विद्यार्थ्यांनी नर्सिंग सीईटीमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत

नर्सिंग सीईटीसाठी तब्बल 32,000 मुलींनी परीक्षा दिली पुणे : 2026-27 साठी बीएससी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्य...

error: Content is protected !!