Homeसामाजिकनगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून चिमुकल्यांना राजकमल सर्कसची रंगतदार मेजवानी

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून चिमुकल्यांना राजकमल सर्कसची रंगतदार मेजवानी

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहरातील लहान मुला-मुलींना आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, त्यांना सर्कस कलेची ओळख व्हावी आणि सर्कस कलाकारांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नगराध्यक्ष दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे पाटील यांच्या पुढाकारातून आज लहान मुला-मुलींना दौंड येथील राजकमल सर्कस दाखविण्यात आली.

सर्कसच्या विविध रोमांचक व मनोरंजनात्मक खेळांचा मुलांनी मोठ्या उत्साहात आनंद घेतला. कलाकारांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण पाहताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता.

लहान मुलांना आनंद देण्यासोबतच सर्कससारख्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन मिळावे आणि या कलेची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य आणि त्यांचा आनंद हेच या उपक्रमाचे खरे समाधान आहे, अशी भावना नगराध्यक्षांनी व्यक्त केली.

सर्कस कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत असतात. त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणे आणि त्यांना समाजातून पाठबळ मिळणे आवश्यक आहे. या भावनेतून राजकमल सर्कसच्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी नगरसेविका स्वाती सावंत व नगरसेविका उज्ज्वला परकाळे उपस्थित होत्या. त्यांनीही मुलांसोबत सर्कसचा आनंद घेत कलाकारांचे कौतुक केले.

या उपक्रमामुळे दौंड शहरातील लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नगराध्यक्षांच्या या उपक्रमाचे पालक व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

error: Content is protected !!