Homeशहरनगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंच्या पुढाकारातून दौंडच्या महिलांना डिजिटल कौशल्यांची नवी भरारी

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळेंच्या पुढाकारातून दौंडच्या महिलांना डिजिटल कौशल्यांची नवी भरारी

✍️ संदिप बारटक्के

दौंड : महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सक्षम करून त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या पुढाकारातून दौंड शहरातील गरजू व होतकरू महिलांसाठी नाममात्र शुल्कात MS-CIT व AI Digital Skills प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील ६० महिलांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

महिलांना केवळ संगणकाचे प्रमाणपत्र मिळावे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, डिजिटल कौशल्य, आत्मविश्वास, रोजगारक्षमता आणि स्वावलंबन वाढविणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. आजच्या डिजिटल युगात संगणक, ऑनलाइन सेवा, डेटा एंट्री, डिजिटल अकाउंटिंग तसेच AI आधारित विविध डिजिटल कौशल्यांचे ज्ञान महिलांसाठी रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

या प्रशिक्षणाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी वर्गाकडून सहकार्य व नोकरीच्या संधीबाबत हमी देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना प्रशिक्षणासोबतच रोजगाराच्या दिशेने पुढे जाण्याची संधी मिळणार आहे.

पहिल्या ६० महिलांच्या प्रशिक्षणाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता हा उपक्रम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असून, पुढील टप्प्यात आणखी ६० महिलांची बॅच सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर १०० महिलांसाठी पुढील बॅच घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दौंड शहरातील अधिकाधिक महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळावा, यासाठी पुढील काळातही अशा कौशल्याधारित उपक्रमांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसीचे विशेष सहकार्य लाभले. रोटरी क्लबचे रो. सुनील ठोंबरे, रो. राजेंद्र जगदाळे (अध्यक्ष), रो. अनिल शितोळे (सचिव), गणेश लबडे व किशोर पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उल्हास मिसाळ व अर्चना मिसाळ यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट व नियोजनबद्ध आयोजन केले. क्रिएटिव्ह कॉम्प्युटर टीमचेही या उपक्रमासाठी विशेष योगदान राहिले.

कार्यक्रमास नगरसेविका स्वाती निलेश सावंत, उज्वला मनीष परकाळे,प्रणिता दिगंबर शिंदे (जठार), राणी सुरज लष्करे तसेच नगरसेवक इंद्रजीत जगदाळे उपस्थित होते

महिलांना मदत करण्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक कौशल्य देणे अधिक महत्त्वाचे आहे, या विचारातून सुरू करण्यात आलेला हा उपक्रम दौंड शहरातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

“कौशल्यातून आत्मविश्वास, आत्मविश्वासातून रोजगार आणि रोजगारातून स्वावलंबन” या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम दौंडच्या महिलांसाठी निश्चितच नवी दिशा देणारा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!