Homeमहत्त्वाचेदौंड रेल्वे स्थानक येथील प्रवाशांचा एल्गार; मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाला निवेदन

दौंड रेल्वे स्थानक येथील प्रवाशांचा एल्गार; मूलभूत सुविधांसाठी प्रशासनाला निवेदन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : दौंड रेल्वे स्थानक येथे (दि.१) दौंड–पुणे–दौंड प्रवाशी संघाच्या वतीने प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात स्थानक प्रमुख ए. के. सिंग यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थित प्रवाशांनी दैनंदिन प्रवासात येणाऱ्या अडचणींचा सविस्तर पाढा मांडत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
प्रवाशांच्या मते, गावातील रेल्वे तिकीट खिडकीचा रात्रीचा वेळ मर्यादित असल्यामुळे उशिराच्या गाड्यांसाठी तिकीट काढताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिकीट खिडकीचा रात्रीचा वेळ वाढविण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच स्थानकावरील लिफ्ट सेवा अनेकदा बंद अवस्थेत आढळते. ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे लिफ्ट सेवा नेहमी कार्यरत ठेवण्याबाबत ठोस सूचना देण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय प्रवासी प्लॅटफॉर्मवर मालगाड्या उभ्या केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते, तसेच सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे प्रवासी प्लॅटफॉर्मवर मालगाड्या उभ्या करू नयेत, अशी मागणी संघाने केली. गाडी येण्यापूर्वी डिस्प्ले बोर्ड सुरू नसल्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे आगाऊ सूचना प्रणाली व्यवस्थित कार्यरत ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
दौंड–पुणे मार्गावरील डेमू गाड्या वारंवार उशिरा धावत असल्याने नोकरी, शिक्षण व व्यावसायिक कारणांसाठी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे. सर्व डेमू गाड्या वेळेत चालविण्याची मागणीही यावेळी ठामपणे मांडण्यात आली.

या सर्व विषयांवर स्थानक प्रमुखांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून संबंधित बाबी वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले.

या प्रसंगी दौंड नगर परिषदेचे गटनेते योगेश कटारिया यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवाशांच्या एकजुटीमुळे या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!