Homeराजकीयदौंड नगरपालिका प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; 'या' नगरसेविकेने उघड केला लपविलेला शासन...

दौंड नगरपालिका प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; ‘या’ नगरसेविकेने उघड केला लपविलेला शासन निर्णय

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | नगरपरिषदेच्या प्रशासनावर शासनाचा महत्त्वाचा निर्णय नगरसेवकांपासून लपविल्याचा गंभीर आरोप करत नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. भिमा नदीलगत दौंड शहराच्या उत्तर भागात ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या ८००० चौरस मीटर जागेबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती सभागृहासमोर ठेवली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नगरसेविका स्वाती सावंत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महसूल व वन विभागाने १३ जानेवारी २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रान्वये दौंड गट क्रमांक २७६/१/अ मधील सुमारे ८००० चौरस मीटर जागा बगीचा व सुशोभीकरणासाठी नगरपरिषदेला महसूलमुक्त व भोगवटा मूल्यरहित तत्त्वावर महसूल व वनविभागाने मुख्याधिकारी यांच्या नावाने प्रदान केली आहे. मात्र त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या महत्त्वाच्या विषयाचा कोणताही उल्लेख करण्यात आला नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शहराच्या विकासात विभागीय समतोल राखणे आवश्यक असून, दक्षिण भागात विविध विकासकामे होत असताना उत्तर भागातील नागरिकांनाही दर्जेदार उद्यानाची सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. भिमा नदी परिसरातील ही जागा ‘नमो उद्यान’साठी योग्य असून, शासनाच्या योजनेअंतर्गत निधीही उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

यापूर्वी नगरपरिषदेच्या सभागृहाने कोणत्याही विशिष्ट जागेला ‘नमो उद्यान’ म्हणून अंतिम मान्यता दिलेली नसल्याचा दावा करत, संबंधित शासन निर्णय नगरसेवकांच्या निदर्शनास आणून देण्यात आला नाही, हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच राजकीय दबावामुळे हा विषय जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आला का, असा सवालही उपस्थित होत आहे.

जुलै अखेर किंवा ऑगस्ट २०२६ मध्ये होणाऱ्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर हा विषय समाविष्ट करून भिमा नदीलगतच्या जागेवर ‘नमो उद्यान’ विकसित करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी स्वाती सावंत यांनी केली आहे.

या प्रकरणामुळे दौंड नगरपरिषदेत प्रशासनाची भूमिका, शासन निर्णयांची माहिती सभागृहापर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया आणि विकासकामांमधील पारदर्शकता याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. नगरसेविका स्वाती सावंत यांनी केलेल्या आरोपांवर प्रशासनाकडून काय स्पष्टीकरण दिले जाते आणि आगामी सभेत या विषयावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता दौंड शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

3 अटक, पुणे ग्रामीण पोलिसांनी 20 गुन्हे उघडकीस आणले

पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोड्या, दरोडे आणि दरोड्याचे 20 गुन्हे उघडकीस आणून अटक केली, तर आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि एक मोटारसायकल असा २५ लाखांचा...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर एमबीबीएस; कु. नेहा रामचंद्र सोनोने यांचा नगरसेविका स्वाती सावंत...

  वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के दौंड | वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या संपादन करून कुटुंबासह दौंड शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु....

error: Content is protected !!