✍️ संदिप बारटक्के
दौंड : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालय, दौंड आणि श्री गजराज गजानन मंडळ, दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामा मशीदसमोर असलेल्या श्री गजराज गजानन मंडळाच्या ठिकाणी होणार आहे. या शिबिरात नागरिकांची रक्त गट तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी, ईसीजी तपासणी, नेत्र तपासणी तसेच कॅन्सर तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
तसेच सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या सामान्य आजारांवर आवश्यक मोफत औषधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
श्री गजराज गजानन मंडळाच्या गणेशोत्सव २०२६ अंतर्गत आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष हर्ष शहा यांच्या हस्ते होणार आहे. .
निरोगी नागरिक आणि सशक्त समाज या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य शिबिरास दौंड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय, दौंड आणि श्री गजराज गजानन मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















