Homeशिक्षण-प्रशिक्षणदौंडच्या ३० विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान..... आजच्या काळात मुलींनी स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट...

दौंडच्या ३० विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान….. आजच्या काळात मुलींनी स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट चे प्रशिक्षण घेणे गरजेचे—- कांचन कुल।

✍️ अख्तर काझी

दौंड : मार्शल आर्ट बॉक्सिंग कराटे ट्रेनिंग स्कूल, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट परीक्षा व ब्लॅक बेल्ट वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या एकूण ३० विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा कांचन कुल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच दौंड नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक योगेश कटारिया, नगरसेवक अमोल काळे, नगरसेवक विजय बोरकर, नगरसेवक नीलेश पवार, नगरसेविका वैशाली माशाळकर, सेन्साई राजेंद्र साळवे सर, गोपाळवाडी सोसायटीचे चेअरमन भीमराव होले, चिरंजीव झा , बाबा दगडे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कराटे प्रात्यक्षिकांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

यावेळी प्रमुख पाहुण्या कांचन कुल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या युगात मुलींनी स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणे, स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवणे तसेच नियमित व्यायाम, योग आणि ट्रेकिंगद्वारे फिटनेस जपणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सर्व महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात 1st Dan Black Belt प्राप्त करणारे सागर रकटे, विद्या पोकार, मयूर विंचूरकर, सिद्धी लोटके, स्वरा सोनवणे आणि आदित्य दरबारे यांनी उत्कृष्ट कराटे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थित मान्यवर, पालक व प्रेक्षकांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरालाल साळवे, शुभम वाघ, स्वराज सोनवणे, तनय काकडे आणि कुणाल विंचूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व आयोजन मास्टर संतोष प्रकाश सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक, मान्यवर व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा दाभोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष सोनवणे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!