Homeक्राईमडोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा दौंड मेडिकल असोसिएशनकडून तीव्र निषेध; डॉक्टर संरक्षण कायद्याच्या प्रभावी...

डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याचा दौंड मेडिकल असोसिएशनकडून तीव्र निषेध; डॉक्टर संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची पोलीस प्रशासनाकडे मागणी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

डोंबिवली येथे डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेचा दौंड मेडिकल असोसिएशनने तीव्र निषेध व्यक्त करत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात असोसिएशनच्या वतीने दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी हे दिवस-रात्र समाजाच्या आरोग्यसेवेसाठी कार्यरत असतात. उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या वैद्यकीय गुंतागुंती किंवा प्रतिकूल परिणामांमुळे कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. अशा हिंसक घटनांमुळे डॉक्टरांचे मनोबल खचते, आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो आणि त्याचा फटका सर्वसामान्य रुग्णांनाही बसतो.

डोंबिवलीतील घटनेतील दोषींवर कठोर आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच डॉक्टर संरक्षणाबाबतची भूमिका वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवावी, अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.

दौंड शहर व परिसरातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरणात सेवा देता यावी, यासाठी असोसिएशनने काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती व वैद्यकीय सेवा संस्था (हिंसाचार व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी, डॉक्टर किंवा रुग्णालयांवर हल्ला अथवा धमकी देणाऱ्यांविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई, प्रमुख रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार पोलीस गस्त वाढविणे, डॉक्टर व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयासाठी अधिकृत संपर्क अधिकारी किंवा तातडीची संपर्क व्यवस्था निर्माण करणे तसेच डॉक्टर संरक्षण कायद्याबाबत रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दौंड मेडिकल असोसिएशनने पोलीस प्रशासनावर विश्वास व्यक्त करत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णालयांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक व कायदेशीर उपाययोजना तातडीने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

असोसिएशनने स्पष्ट केले की, दौंड मेडिकल असोसिएशन ही कायद्याचा पूर्ण आदर करणारी संघटना असून समाजाला अखंड, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणे हेच तिचे ध्येय आहे. सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे ही प्रशासन आणि समाजाची संयुक्त जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

error: Content is protected !!