वृत्तवेध मarath i/ संदिप बारटक्के
दौंड : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे दौंड येथे हिंदू व्यायाम संघ यांच्या वतीने भव्य महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला शिवभक्त, नागरिक, विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिवजयंतीनिमित्त आयोजित शालेय वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, मावळे आदी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान व देशभक्तीची भावना दृढ झाल्याचे दिसून आले.
शिवजयंती निमित्त उपस्थित सर्व शिवभक्त, शालेय विद्यार्थी व पालकांसाठी शिव प्रसाद म्हणून भोजनाची उत्तम व्यवस्था शेठ जोती प्रसाद विद्यालय, दौंड येथे करण्यात आली होती. शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छता आणि सेवाभाव यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हिंदू व्यायाम संघाच्या ज्येष्ठ पदाधिकारी व सभासदांनी मनोभावे केले. शिवजयंतीच्या निमित्ताने एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि शिवरायांच्या विचारांचा जागर कार्यक्रमातून प्रभावीपणे घडवून आणण्यात आला. उपस्थित नागरिकांनी हिंदू व्यायाम संघाचे विशेष कौतुक केले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















