वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड — दौंड नगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सन्मान स्त्री शक्तीचा – होम मिनिस्टर’ स्पर्धेत वर्षा अमोल जगताप यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दौंड शहरात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दौंड शहरातील राजधानी हॉटेलजवळील मैदानात दौंड नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. ७ ते १० मार्च या कालावधीत पार पडलेल्या या प्रदर्शन व खाद्य महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा दुगदिवी जगदाळे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्यांसह महिला भगिनी उपनगराध्यक्षा छाया थोरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘सन्मान स्त्री शक्तीचा – होम मिनिस्टर’ यांचे सादरीकरण प्रा. दिनेश पवार यांनी केले. या स्पर्धेत एकूण ७८ महिलांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत वर्षा अमोल जगताप यांनी प्रथम, वर्षा गणेश ठाकूर यांनी द्वितीय तर सरिता गौरव कुल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच लकी ड्रॉमध्ये स्नेहल वाठारकर व ज्योती मोकळ यांना भेट स्वरूपात साडी देऊन गौरविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्षा शीतल योगेश कटारिया उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. संजीवनी शिरगुप्पे, डॉ. प्रतिभा भंगाळे, डॉ. अनुराधा वाळके, डॉ. शलाका लोणकर, डॉ. मिनल वागसकर, अॅड. जयश्री कामत, अॅड. अरुणा डहाळे, सुशिला बाबूराव स्वामी, शैलजा सरनोत, शैला जगताप, उल्का कांबळे, ज्योती रायकर, सुरैया बेगम युसुफ, ठामा खोमणे व आशा खोमणे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन नगराध्यक्षा दुगदिवी जगदाळे, उपनगराध्यक्षा छाया थोरात, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती नमिरा सय्यद तसेच ज्योती राऊत, स्वाती सावंत, रूचिता कटारिया, रेणूका थोरात आणि प्रणिता शिंदे यांनी केले.
प्रा दिनेश पवार यांच्या सन्मान स्त्री शक्तीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमाने स्पर्धेत रंगत आणली. कार्यक्रम बुकिंग साठी संपर्क 8308310208 या नंबरवर संपर्क साधा

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























