Homeमहत्त्वाचेसंभाव्य पूरस्थितीवर दौंड नगरपरिषद अलर्ट; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर तयारी

संभाव्य पूरस्थितीवर दौंड नगरपरिषद अलर्ट; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी युद्धपातळीवर तयारी

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दौंड मध्ये संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन दौंड नगरपरिषद प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी दौंड नगरपरिषदेत आपत्कालीन व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

बैठकीत शहरातील पूरप्रवण भाग, पाणी साचणारी ठिकाणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना, स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, आपत्ती निवारण पथकांची तयारी, आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीची उपलब्धता आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. संभाव्य संकटाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्षा छाया थोरात, आरोग्य सभापती कार्तिकी सोनवणे, गटनेते जिवराज पवार, नागरिक हित संरक्षण मंडळाचे गटनेते योगेश कटारिया यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व विभागप्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महावितरण, तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाशी तात्काळ समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून नागरिकांसाठी टोल-फ्री संपर्क व्यवस्था उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. नदीकाठच्या परिसरात २४ तास सुरक्षा व्यवस्था ठेवणे, आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे आणि परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची तयारी ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.
पूरस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यासाठी जुनी नगरपरिषद इमारत, गणेश हॉल, सिंधी मंगल कार्यालय तसेच आवश्यकतेनुसार नवीन पंचायत समिती, बुद्धविहार, गुजराती भवन, रामकृष्ण हॉल आणि योगराज हॉटेल ही ठिकाणे सज्ज ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

कस्तान चाळीतील नदीकाठावरील नागरिकांना सतर्क करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, आवश्यकतेनुसार स्थलांतराच्या सूचना देणे, फॉगिंग मशिनद्वारे सर्व वॉर्डमध्ये फवारणी करणे, शाळा व महाविद्यालयांना आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध करून देणे, सर्व चेंबर्स व पावसाळी गटारे तातडीने स्वच्छ करणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र आपत्कालीन पथक तयार ठेवण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.

याशिवाय बाजारतळ परिसरातील साचलेले पाणी त्वरित बाहेर काढण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणे, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावणे, धोकादायक झाडांची छाटणी करणे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी चोवीस तास कर्मचारी तैनात ठेवणे आणि शहरातील सर्व पावसाळी गटारांची तातडीने साफसफाई करण्यावर भर देण्यात आला.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देता यावा यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहून सतर्क राहण्याच्या सूचना नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी दिल्या.

दौंड नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पूर्णपणे सज्ज असून परिस्थितीनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक :
दौंड नगरपरिषद – आपत्ती व्यवस्थापन कक्ष
☎️ ०२११७-२९९१४४

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!