वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड — पुणे जिल्हा परिषद व दौंड पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या वतीने खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषद गटातून वीरधवल कृष्णराव जगदाळे हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी परिसरातील विविध गावांमध्ये व्यापक संपर्क दौरा व पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.
या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने काळेवाडी, राजेगाव, शिंग्रोबामाळ (राजेगाव), खैरे वस्ती (राजेगाव), खडकी, खानोटा पदयात्रा, खोमणे वस्ती (बोरिबेल), साळुंखे वस्ती (बोरिबेल) तसेच काळेवस्ती, आलेगाव या भागांमध्ये मतदारांशी जगदाळे यांनी थेट संवाद साधला. यावेळी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा, शिक्षण, शेतकरी प्रश्न तसेच गावांच्या मूलभूत विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी आपल्या अपेक्षा व सूचना उमेदवारांसमोर मांडल्या. त्या सर्व बाबी प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन वीरधवल जगदाळे यांनी यावेळी दिले.
खडकी–देऊळगाव राजे गटात वीरधवल बाबा जगदाळे यांचे नाव घेताच नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण होतो. त्यांनी यापूर्वी केलेल्या विकासकामांमुळे परिसरात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून “काम पाहिलं की अभिमान दाटून येतो” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे या गटात त्यांना मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी निवडणुकीत विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक विकासासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























