वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड — श्रद्धेय अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वा खालील वंचित बहुजन आघाडीच्या दौंड तालुका अध्यक्षपदी जगदाळे वस्ती (शाहूनगर), ता.दौंड येथील आंबेडकर घराण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते अक्षय बालिसाब शिखरे यांची निवड करण्यात आली आहे.
अक्षय शिखरे हे आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ते असून दौंड तालुक्यामध्ये भारिप बहुजन महासंघाचे काम त्यांनी एकनिष्ठे ने केले आहे तसेच, वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून ते आजतागायत श्रद्धेय अँड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ राहून सामाजिक, राजकिय व धम्माच्या कार्यात ते सक्रिय असून ते भिमयोद्धा संघटना या सामाजिक संघटनेचे संस्थापक आहेत, त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षा मध्ये यापूर्वी दौंड शहर महासचिव म्हणून ही काम पाहिलेले आहे. त्यांच्या या एकनिष्ठ व प्रामाणिक पणे करत असलेल्या कार्याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठीने त्यांची नुकतंच वंचित बहुजन आघाडीच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी निवड केली आहे , त्यांच्या या सार्थ निवडीबद्दल मित्र परिवारामध्ये सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























