✍️ संदिप बारटक्के
दौंड : लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना, दौंड शहर व तालुकाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अन्नदानाचा सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत अन्नदानाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला माजी आमदार रमेश थोरात, नगरसेवक योगेश कटारिया, निलेश सावंत, दिपक सोनवणे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा व साहित्यिक वारशाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त केले.
या सामाजिक उपक्रमाचे आयोजन लहुजी शक्ती सेना दौंड शहर अध्यक्ष धीरज दिवटे, उपाध्यक्ष साहिल खंडाळे, हिरण खुडे, अमित ससाणे तसेच लहुजी शक्ती सेना दौंड तालुका अध्यक्ष अमित मोरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर आणि उपस्थित नागरिकांचे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. समाजहितासाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























