वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : लहुजी नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती उत्सवानिमित्त नवीन कार्यकारिणी निवडीसाठी बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी शुभम साळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी उपाध्यक्षपदी किरण अवघडे, कार्याध्यक्षपदी निखिल साळवे, खजिनदारपदी रोहित खुडे व पप्पू अडागळे, सचिवपदी राहुल ओहळ, तर उपसचिवपदी रोहन खुडे यांची निवड करण्यात आली.
बैठकीस रमेश खुडे, संकेत साळवे, काशीनाथ अडागळे, ओम क्षीरसागर, अक्षय गायकवाड, मयुर तुपसौंदर्य आणि विकास ढावरे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीच्या निवडीनंतर उपस्थितांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा निर्धार व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























