✍️संदिप बारटक्के
दौंड : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य सन्मान सोहळ्यात दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांची समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत “महिला शक्तीरत्न पुरस्कार – २०२६” पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून त्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांच्या हस्ते झालेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली.
पुरस्कार स्वीकारताना त्यांच्यासोबत दौंड नगरपरिषदेच्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत, प्रणिता शिंदे-जठार आणि राणी लष्करे उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
हा पुरस्कार सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभाग यांच्या सहकार्याने तसेच श्रेयस सोनवणे आणि सचिन गायकवाड यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी हा सन्मान दौंड शहरातील नागरिकांच्या विश्वासाचा आणि समाजसेवेच्या कार्याची मिळालेली पावती असल्याची भावना व्यक्त केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सामाजिक न्याय विभाग आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानत, भविष्यातही नागरिकांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















