✍️ अख्तर काझी
दौंड : दौंड शहरात चातुर्मास निमित्त जैन महासती दिव्यदर्शनाजी व महासतीजी पुनीतदर्शनाजी यांचे आगमन झाले आहे. शहरातील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या जैन स्थानक येथे त्यांचे जैन बांधवांनी स्वागत केले.
शहरातील पीडीसीसी बॅंक शाखेसमोरील श्री जैन स्थानक येथे महासतींचा चातुर्मासआहे. प्रवेशानंतर महासतीजी पुनीतदर्शनाजी यांनी चातुर्मास काळातील नित्य सामूहिक प्रार्थना, व्याख्यान, आगम अध्ययन, प्रतिक्रमण, स्वाध्याय, तप साधना, आचार्य आनंदऋषीजी महाराज यांची जन्मजयंती, आदी उपक्रमांची संक्षिप्त स्वरूपात माहिती दिली. प्रवेशप्रसंगी पुणे, अहिल्यानगर, जामखेड, केडगाव ( ता. दौंड), केडगाव ( जि. अहिल्यानगर), काष्टी, आदी ठिकाणचे श्रावक व श्राविका उपस्थित होते. मंगलपाठाने या कार्यक्रमाची सांगता झाली.
२९ जुलै रोजी गुरूपौर्णिमेच्या दिवशी चातुर्मासास प्रारंभ होत आहे. चातुर्मास काळात स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पर्यूषण, संवत्सरी महापर्व, आयंबिल ओळी तप, श्री उत्तराध्ययन सूत्र आराधना, गौतम प्रतिपदा, भगवान महावीर निर्वाण कल्याणक, ज्ञानपंचमी, वीर लोकाशाह जयंती आदी निमित्त विविध उपक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे.
०००००

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















