Homeराजकीयदौंड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अतुल जगदाळे यांची निवड

दौंड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अतुल जगदाळे यांची निवड

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहर व तालुका काँग्रेस कमिटीची बैठक २१ सप्टेंबर रोजी चौफुला येथील बोरमलनाथ मंदिर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत काँग्रेस पक्षात नवीन कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. तसेच दौंड शहर काँग्रेस कमिटीच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

दौंड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी अतुल अशोक जगदाळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी दत्ता शिंदे, रज्जाक शेख, सुमित स्वामी आणि अतुल थोरात, सरचिटणीसपदी हैदर शेख, महासचिवपदी मोसीन बावस्कर, सचिवपदी मोहसीन शेख, संघटकपदी सुरेश क्षीरसागर, तर खजिनदारपदी श्रेयस मुनोत यांची निवड करण्यात आली.

या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लहू निवगुणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

नवीन जबाबदारी स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधणे, पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे आणि जनसंपर्क मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि संविधानिक मूल्ये समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांवर संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणे, कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि पक्षाचा जनसंपर्क व्यापक करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस काँग्रेसचे पदाधिकारी, नवनिर्वाचित पदाधिकारी, नवीन कार्यकर्ते आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे दौंड शहरातील काँग्रेस संघटनेला नव्या स्वरूपात बळकटी मिळण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!