✍️ अख्तर काझी
दौंड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, रोटरी क्लब ऑफ दौंड आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील उपक्रमशील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रत्येक शाळेतील इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणारे विद्यार्थी तसेच दौंड तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा भव्य सत्कार समारंभ अष्टविनायक मंगल कार्यालय, दौंड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक पांडुरंग बुरुंगे हे होते. यावेळी नीट (NEET) परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम व देशात पाचवा क्रमांक मिळवून दौंड तालुक्याचे नाव उज्ज्वल करणारी कु. श्रावणी कुदळे हिचा विशेष सत्कार करून तिच्या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, संपादक रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी सचिव आदिनाथ थोरात, रोटरी क्लबचे संचालक रो. सुनील ढगे, रो. डॉ. संजय इंगळे,रो. हरिभाऊ ठोंबरे, रो. प्रज्ञा राजोपाध्ये, रो. मोहिनी सुरवसे, यांच्यासह शिक्षण, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ दौंडच्या अध्यक्षा रो. पायल भंडारी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक भुजबळ व रोटरी क्लब ऑफ दौंडचे सचिव महेश दरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव उत्तम जावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सुरेश वाघमोडे यांनी केले.
हा गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) चे उल्हास मिसाळ, नितीन साळवे, शहीद जवान हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शुभांगी मोरे तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा गौरव सोहळ्यांमुळे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळते अशा भावना व्यक्त केल्या

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























