Homeशहरज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने ‘करा तयारी’ स्पर्धा परीक्षेचे स्कॉलरशिप बक्षीस वितरण सोहळा...

ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने ‘करा तयारी’ स्पर्धा परीक्षेचे स्कॉलरशिप बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

दौंड ग्रामीण प्रतिनिधी / सुरेश बागल

दौंड : ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘करा तयारी’ स्पर्धा परीक्षेच्या स्कॉलरशिप बक्षीस वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या परीक्षेत २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपला आत्मविश्वास आणि गुणवत्ता सिद्ध केली.

स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे माध्यम. या उद्देशाने संस्थेच्या वतीने सातत्याने विविध स्पर्धा परीक्षा उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा सिटी प्राईड येथे संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पोळ, पंचायत समिती सदस्य सुमन निकाळजे, भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम, नगरसेविका ज्योतीताई राऊत, रोटरी क्लब दौंड शहर अध्यक्ष दीपक शासम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग दौंड तालुका अध्यक्ष बी. वाय. जगताप, ज्योतीताई मोकळ, जिल्हा परिषद शिक्षक गौतम कांबळे, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब वाघमारे, गणेश हाके, जीवन धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

पाचवी ते सातवी गटातील गुणवंत विद्यार्थी :
प्रथम क्रमांक – शिवांश योगेश कणसे (बक्षीस वितरण: बी. वाय. जगताप)
द्वितीय क्रमांक – साहिल बाळू रुपनवर
तृतीय क्रमांक – संचिता अंकुश वाघमारे (बक्षीस वितरण: दीपक शासम)
आठवी ते दहावी गटातील गुणवंत विद्यार्थी :
प्रथम क्रमांक – रोहित सुनील गिरमे (बक्षीस वितरण: विठ्ठल खाडे)
द्वितीय क्रमांक – जीशान अमन पठाण (बक्षीस वितरण: आयु. साहेबराव पोळ)
तृतीय क्रमांक – सानिका दत्तात्रेय लावर (बक्षीस वितरण: सौ. स्वातीताई पवार)

या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य रणरागिणी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा सौ. रोहिणी पवार यांनी केले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तोहीद पठाण, पूजा जाधव, राणी वाल्मिकी, जानवी बारटक्के या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे व सचिव सौ. वैशाली रणदिवे यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी व पालकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देत त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्याचा संकल्प या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!