वृत्तवेध मarathi/ संदिप बारटक्के
दौंड — पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यातील खडकी–देऊळगावराजे जिल्हा परिषद गटातून भरघोस मतांनी विजयी झाल्यानंतर मतदार बंधू-भगिनींचे आभार मानताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे वीरधवल जगदाळे यांनी आपला हा विजय स्वर्गीय अजितदादांना समर्पित केला आहे.
“आज स्वर्गीय अजितदादा आपल्यात असते तर या विजयाचा आनंद निश्चितच द्विगुणित झाला असता. मात्र त्यांचे विचार आणि कार्य आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जिवंत आहेत,” अशी भावना वीरधवल जगदाळे त्यांनी व्यक्त केली.
खडकी–देऊळगावराजे जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू-भगिनींचे तसेच निवडणुकीदरम्यान अहोरात्र परिश्रम घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
“आगामी काळात जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण व सक्षम विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन,” अशी ग्वाही यावेळी जगदाळे यांनी दिली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























