Homeमहत्त्वाचेउशिरा धावणाऱ्या डेमूंमुळे प्रवासी हैराण; अतिरिक्त कोचची ट्रायल लवकरच

उशिरा धावणाऱ्या डेमूंमुळे प्रवासी हैराण; अतिरिक्त कोचची ट्रायल लवकरच

वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के 

दौंड : दौंड–पुणे मार्गावरील डेमू गाड्या अनियमित धावत असल्यामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कार्यालयीन वेळेत गाड्या उशिरा धावणे, अचानक रद्द होणे किंवा वेळापत्रकात बदल होणे यामुळे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक वर्गाचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर दौंड प्रवासी वर्गाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.

प्रामुख्याने खालील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले :

७१४०२ दौंड–पुणे डेमू (सकाळी ६:०५)

७१४०४ दौंड–पुणे डेमू शटल (सकाळी ७:०५)

७१४०६ बारामती–पुणे डेमू (सकाळी ८:२५)

७१४०७ पुणे–दौंड डेमू (दुपारी ३:००)

७१४११ पुणे–बारामती डेमू (संध्याकाळी ६:४५)

७१४१३ पुणे–दौंड डेमू (रात्री ८:०५)

या सर्व गाड्या वेळेवर धावाव्यात तसेच अनियमिततेला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गाने केली. यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश कुमार वर्मा यांनी संबंधित विभागाला आवश्यक सूचना देत वेळापत्रक सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

तसेच प्रायोगिक तत्वावर दौंड–पुणे शटलसाठी अतिरिक्त कोच जोडून लवकरच ट्रायल घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रायल यशस्वी झाल्यानंतर इतर डेमू लोकल गाड्यांनाही अतिरिक्त कोच जोडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन डीआरएम राजेश कुमार वर्मा यांनी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे -पाटील यांना दिले.

या भेटीदरम्यान दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगरसेवक इंद्रजीत जगदाळे-पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

नराधम बापाचा स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार……सत्र न्यायालयाने नराधमास ठोठावली सश्रम जन्मठेपेची शिक्षा……. पिडीतेला...

  ✍️ अख्तर काझी दौंड: स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी दि....

error: Content is protected !!