HomeराजकीयDaund | प्रभाग क्रमांक १३ मध्ये NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा...

Daund | प्रभाग क्रमांक १३ मध्ये NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांना डिजिटल प्रवासाची सुविधा सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादात मिळाला.

हे शिबिर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा दौंड शहर उपाध्यक्षा सीमा शेंडे यांच्या पुढाकाराने, नगरसेविका ज्योती राऊत व नगरसेवक विजय बोरकर यांच्या नियोजनातून, दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली, तसेच माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया आणि दौंड शहराध्यक्ष रितेश ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली भोईटेनगर, दौंड येथे आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा छाया थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दौंडच्या माजी नगराध्यक्ष शीतल कटारिया, नगरसेविका कार्तिकी सोनवणे, मनीषा जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टी, दौंड शहरचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नियोजन, नोंदणी प्रक्रिया आणि नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले. त्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण शिबिर सुरळीत पार पडले.

या उपक्रमाचा लाभ प्रभागातील अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थ्यांनी घेतला. NCMC स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. डिजिटल आणि सुलभ प्रवासाच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शिबिराला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आयोजकांनी सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही नागरिकांच्या सोयीसाठी अशाच लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

error: Content is protected !!