Homeताज्या बातम्याCET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान; आमदार राहुल कुल संतापले, दोषींवर...

CET परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान; आमदार राहुल कुल संतापले, दोषींवर कठोर कारवाईची मागणी!

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेण्यात आलेल्या LLB-3 Year CET परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादरपूर्वक एकेरी उल्लेख केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी संबंधित दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या LLB-3 Year CET ऑनलाइन परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान विभागात “शिवाजीच्या मंत्रीमंडळाचे नाव काय होते” असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या थोर राजांच्या आदर्शावर आजचे प्रशासन चालते आणि ज्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपली, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शैक्षणिक परीक्षेत इतक्या बेजबाबदारपणे आणि एकेरी भाषेत होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. या प्रकारामुळे तमाम शिवप्रेमी आणि विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून परीक्षार्थींनी यासंदर्भात आमदार राहुल कुल यांच्याकडे निवेदन देऊन दाद मागितली होती.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राहुल कुल यांनी आयुक्त, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात पुढील मागण्या केल्या आहेत—सदर प्रश्नपत्रिका संकलित करणारी समिती आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. CET Cell ने या गंभीर चुकीबद्दल तातडीने सार्वजनिकरीत्या माफीनामा प्रसिद्ध करावा. भविष्यात कोणत्याही शासकीय किंवा शैक्षणिक परीक्षेत महापुरुषांचा अवमान होणार नाही, यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी. तसेच यापुढे सर्व शैक्षणिक साहित्यात आणि प्रश्नपत्रिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा पूर्ण आणि आदरयुक्त उल्लेख अनिवार्य करण्यात यावा.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांचा अवमान कोणत्याही स्तरावर सहन केला जाणार नाही. शैक्षणिक संस्थांनी आणि परीक्षा मंडळांनी अत्यंत जबाबदारीने काम करणे अपेक्षित असताना असा निष्काळजीपणा होणे चुकीचे आहे. यावर राज्य सरकारने तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका आमदार राहुल कुल यांनी मांडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्जमाफी योजनेनंतर कंपनी सेक्रेटरी कोर्समध्ये 1,000 पर्यंत ड्रॉपआउट्स पुन्हा सामील होतात

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवन चांडक पुण्यात बोलत होते पुणे : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ने...

‘अनुकूल कामाची नियुक्ती नाकारली’: प्रकल्प व्यवस्थापकांनी पुण्यातील TCS तंत्रज्ञांना आत्महत्येकडे कसे वळवले; अटक होण्याची...

पुणे जिल्ह्यातील ४८ वर्षीय आयटी व्यावसायिकाच्या कथित आत्महत्येनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) दोन कर्मचाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे :...

पुण्यातील तांत्रिकाची आत्महत्या: सहकाऱ्याच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तीन आरोपींसह आयटी फर्मच्या दोन महिला अधिकाऱ्यांचा...

AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे - भोसरी पोलिसांनी हिंजवडी येथील एका प्रख्यात आयटी कंपनीतील दोन महिला अधिकारी आणि 48 वर्षीय...

आळंदीजवळ जमीन विकासकाची ४ लाख रुपयांची सोनसाखळी लुटली | पुणे बातम्या

पुणे : दोन अज्ञातांनी 50 वर्षीय जमीन विकासकाला धारदार शस्त्राने जखमी करून मंगळवारी रात्री उशिरा चार लाख रुपये किमतीची सोनसाखळी लुटून नेली.आळंदीजवळील...

वाडेबोल्हाई रोड अपघातात 14 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुणे बातम्या

पुणे : बुधवारी दुपारी वाडेबोल्हाई येथील वाडेगाव रोडवर पिकअप ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर तिची मैत्रिण किरकोळ जखमी...

error: Content is protected !!