Homeशहरवर्षभराचा अंधार दूर | दौंड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरू; नगराध्यक्षा दुर्गादेवी...

वर्षभराचा अंधार दूर | दौंड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरू; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

✍️ संदिप बारटक्के

दौंड : दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने बसविण्यात आलेले पथदिवे गेल्या वर्षभरापासून बंद असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे या रस्त्यावरील बंद पथदिवे पुन्हा सुरू झाले असून, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दौंड शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. तसेच शहरातील नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचीही या मार्गावरून ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता होती. अंधारामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार, ई-मेल तसेच विविध माध्यमांतून सातत्याने पाठपुरावा केला. वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून, महामार्गावरील काही प्रमुख भागांतील पथदिवे पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

शहरातील नगरमोरी चौक, उड्डाणपूल परिसर, संयोग हॉटेल परिसर, राजधानी हॉटेल परिसर, गोल राऊंड ते बोरावके नगर, गोकुळ हॉटेल परिसर तसेच एसआरपीएफ ते लोखंडे वस्ती या भागांतील पथदिव्यांच्या प्रश्नावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. या परिसरातील प्रकाशव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकूण १३३ खांबांवर नवीन दिवे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून, उर्वरित ठिकाणांवरील कामेही येत्या काही दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

केवळ पाठपुरावा नव्हे, तर प्रत्यक्ष कार्यवाहीवर भर

शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधणे आणि प्रलंबित कामांना गती देणे आवश्यक असते. महामार्गावरील पथदिव्यांचा प्रश्नही गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होता. मात्र, नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे बंद पथदिवे पुन्हा सुरू होण्याबरोबरच नवीन दिवे बसविण्याच्या कामालाही गती मिळाली आहे.

पथदिवे सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, या कामाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. तथापि, उर्वरित ठिकाणांवरील दिवेही लवकरात लवकर सुरू व्हावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या वेळी नगरसेवक मुकेश जगताप, विकास लोंढे तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

वर्षभरापासून अंधारात असलेल्या महामार्गावरील पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाल्याने दौंडकरांना दिलासा मिळाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या पुढाकारातून नारीशक्तीचा जागर; दौंडमध्ये महिला भगिनींच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘नवरात्रोत्सव – नारीशक्ती महोत्सव २०२६’ हा नऊ दिवसीय...

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी | विवाह नोंदणी आता दररोज सुरू; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या...

     _ संदिप बारटक्के दौंड : दौंडकरांसाठी आनंदाची बातमी... उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणीचे कामकाज आता कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या...

महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या चोरांची दौंड मध्ये पुन्हा एन्ट्री …….. भोईटे नगर येथील...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील भोईटे नगर येथे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी...

दौंडकरांच्या पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक! साठवण तलावात तातडीने पाणी सोडा; आमदार राहुल कुल यांच्याकडे एकमुखी...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी साठवण...

“पाझर फुटू दे आई तुकाई!” बळीराजावरील दुष्काळाचे संकट दूर कर; नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांचे...

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने ओढ दिली असल्याने यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी शेतकरी बांधवांसह नागरिक चिंतेत असताना,...

error: Content is protected !!