Homeताज्या बातम्यादौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीची चौकशी होणार; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुद्देनिहाय अहवाल मागविला

दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधातील तक्रारीची चौकशी होणार; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुद्देनिहाय अहवाल मागविला

✍️संदिप बारटक्के

दौंड : दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची दखल घेत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेने दौंड नगरपरिषदेकडून मुद्देनिहाय व स्वयंस्पष्ट अहवाल मागविला आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन शाखेकडून दि. १९ जुलै २०२६ रोजी दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात बाबा उर्फ करीम शेख यांनी दि. २९ जून २०२६ रोजी केलेल्या तक्रारीचा तसेच दि. ८ जुलै २०२६ रोजीच्या आवक क्रमांक १९२० चा संदर्भ देण्यात आला आहे.

तक्रार अर्जामध्ये दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधुत तावडे यांच्याकडून विविध प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा, भ्रष्टाचारास पाठीशी घातल्याचा, दप्तर दिरंगाई केल्याचा तसेच शासकीय कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने या तक्रारीची दखल घेत सदर विषय दौंड नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील व कार्यकक्षेतील असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे प्राप्त तक्रार अर्जाच्या अनुषंगाने संबंधित सर्व मुद्द्यांवर वस्तुनिष्ठ, स्पष्ट आणि स्वतंत्रपणे माहिती देणारा मुद्देनिहाय स्वयंस्पष्ट अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे पत्र मच्छिद्र घोलप, सह आयुक्त, गट-अ, नगरपालिका शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. पत्राची प्रत तक्रारदार बाबा उर्फ करीम शेख यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

चौकशीच्या अहवालाकडे लक्ष,,,

जिल्हाधिकारी कार्यालयाने थेट आरोपांवर निष्कर्ष नोंदविलेला नसून, तक्रारीतील मुद्द्यांवर दौंड नगरपरिषदेचा अधिकृत व कागदोपत्री खुलासा मागविला आहे. त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासनाकडून कोणता अहवाल सादर केला जातो आणि तक्रारीतील आरोपांबाबत कोणती कागदपत्रे व स्पष्टीकरण दिले जाते, याकडे दौंड शहराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

दौंड चे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे आणि पत्रकारांमधील वाद विकोपाला….. पत्रकारांचा पोलिसांच्या पत्रकार...

  ✍️ अख्तर काझी दौंड: दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी एका चोरीच्या घटनेतील अटक आरोपीं बाबत माहिती देण्यासाठी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांचा ज्येष्ठ...

दौंड शहरातील गुरुनाथ गायकवाड यांना उत्कृष्ट सेवा पदक; पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या वतीने पोलिस दलात उत्कृष्ट, उल्लेखनीय व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला....

अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या...

  ✍️ अख्तर काझी दौंड: भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्ट सेवा, शिस्त,कार्य तत्परता आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अधिकारी...

गवळवाडी येथे मोफत रक्तगट व नेत्र तपासणीसह रक्तदान शिबिर

  पवन साळवे गवळवाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवळवाडी येथे डॉ. अमृता सूरज चवंडके व चवंडके परिवाराच्या वतीने मोफत रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि रक्तदान...

error: Content is protected !!