संदिप बारटक्के
दौंड | समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत DSR कंपनीने आपल्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत राज्यभरात एकूण 100 सायकलींचे वितरण करण्यात आले असून, त्यापैकी दौंड येथे 5 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
हा सामाजिक उपक्रम DSR कंपनीचे ओनर श्री. विनायक महाडेश्वर व त्यांच्या परिवाराच्या प्रेरणेतून तसेच कंपनीचे बिझनेस हेड श्री. दिलीप राणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यक्रमाला DSR कंपनीच्या एमराल्ड रेकग्निशन अचीव्हर राणी ठाकूर, ब्रँड ॲम्बेसेडर शिवाजी मोरे, जयश्री मंगवडे, अनिल मंगवडे, साधना सोनवणे आणि पंकज सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सायकलमुळे विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवास अधिक सोयीचा होईल, वेळेची बचत होईल आणि शिक्षणात सातत्य राखण्यासाठी त्यांना मोठी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
व्यवसायाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत DSR कंपनीने राबविलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षण, सामाजिक विकास आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी भविष्यातही अशाच विविध सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















