वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त दौंड शहरात भिम वॉरियर्स व भीमशक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका “तुम्ही खाता त्या भाकरीवर… बाबासाहेबाची सही हाय रं” या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेल्या कडूबाई खरात यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
हा कार्यक्रम शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राहुल कुल व कांचनताई कुल यांच्या हस्ते होणार असून, यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाबाबतची माहिती भिम वॉरियर्स चे अध्यक्ष प्रमोद राणेरजपूत यांनी दिली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























