Homeताज्या बातम्यादिव्यांग विद्यार्थ्यांच्या सेवेकरिता मी कधीही कटिबद्ध राहील – आमदार राहुल कुल

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सेवेकरिता मी कधीही कटिबद्ध राहील – आमदार राहुल कुल

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के 

दौंड : येथील स्व. सुभाष अण्णा कुल मतिमंद व बहुविकलांग मुलांची विशेष शाळा येथे विशेष मुलांसाठी डिजिटल वर्गाचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन,” असे आश्वासक उद्गार आमदार कुल यांनी व्यक्त केले.

क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड, एमआयडीसी कुरकुंभ यांच्या सामाजिक दायित्व (CSR) निधीतून शाळेला डिजिटल इंटरॅक्टिव्ह पॅनलचे तीन संच देण्यात आले. तसेच श्रीमती कोकिळा कटारिया यांनी आपल्या देणगीतून डिजिटल वर्ग साकारला.

या प्रसंगी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, आदर्श विद्यार्थी सन्मान, दाता सन्मान आणि विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप असे विविध उपक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती आप्पासाहेब पवार होते. “विशेष मुलांचे संगोपन करणे हे मोठे कार्य असून त्यातून मिळणारा आनंद अमूल्य असतो,” असे मत त्यांनी व्यक्त करत पालक, शिक्षक व दात्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दौंड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा छायाताई दिपक थोरात, गटनेते योगेश कटारिया, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश जगदाळे, नगरसेवक वसीम शेख, एजीएम, क्लीन सायन्स विठ्ठल थोरात, संदिप हेंद्रे, प्रशांत भंडारी, संजय शिंदे, बळीराम चौगुले, हर्ष विधाते, संदिप त्रिभुवन, सतीश थोरात, नीता वाघमारे (पोलीस पाटील), नवीन वाडिया, निखिल काळे, सौरभ चव्हाण, जयाबाई गौरे, नागसेन धेंडे, नगरसेवक अमोल काळे, राजू बारवकर, सागर जगताप, हरिभाऊ ठोंबरे, तेजस कांबळे, मिलिंद साळवे, सचिन कुलथे, निखिल स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा विजया राठोड, आदर्श पालक फिलिप दाखले तसेच विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दाता सन्मानासाठी क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हेमलता परदेशी, नगरसेवक शहानवाज पठाण,रामेश्वर मंत्री, महेश कदम, दत्तात्रेय वाघोले, प्रियंका पाटील, नितीन वागस्कर, महेश पवार, डॉ. महेंद्र मनोत, न्यू झोपडपट्टी सुरक्षा विकास दल, डॉ. संजय इंगळे, तेजस कांबळे,ऐश्वर्या शासन फाउंडेशन, डॉ. प्रीती जाधव, विजयकुमार बोधे यांचा गौरव करण्यात आला.

चिरंजीव प्रणव शिंदे यांना आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच रेश्मा, आश्विन दाखले आणि स्वप्निल पवार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात विशेष सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश बत्तीसा आणि गणेश हाके यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!