Homeसामाजिकदौंड येथे वाहन परवाना शिबीर नियमित सुरू करण्याची मागणी; आमदार राहुल कुल...

दौंड येथे वाहन परवाना शिबीर नियमित सुरू करण्याची मागणी; आमदार राहुल कुल यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड — कोविड-१९ काळात बंद करण्यात आलेले दौंड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (RTO) वाहन परवाना शिबीर पुन्हा नियमितपणे सुरू करण्यात यावे, अशी ठाम मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार कुल यांनी मुंबई येथे मंत्री सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

आमदार राहुल कुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहर व तालुक्यातील नागरिकांना सध्या वाहन परवाना तसेच इतर RTO संबंधित कामांसाठी बारामती येथे जावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही मोठ्या प्रमाणात खर्च होत असून, विशेषतः ग्रामीण भागातील तरुण व वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

कोविड-१९ पूर्वी दौंड येथे नियमितपणे वाहन परवाना शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पातळीवरच नागरिकांची कामे सहजपणे पूर्ण होत होती. मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही शिबिरे तात्पुरती बंद करण्यात आली होती. सध्याच्या घडीला परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली असली, तरीही ही शिबिरे अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी दौंड येथे वाहन परवाना शिबीर पुन्हा पूर्ववत आणि नियमित सुरू करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आमदार कुल यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. स्थानिक पातळीवर RTO सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल आणि प्रशासनावरचा ताण देखील कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार राहुल कुल यांच्या या मागणीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, दौंड आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी वाहन परवाना शिबीर लवकरच नियमित सुरू करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आमदार कुल यांनी दिली.

दौंड तालुक्यातील नागरिकांना या निर्णयाची प्रतीक्षा लागून राहिली असून, शिबीर लवकरात लवकर सुरू झाल्यास स्थानिक स्तरावर मोठा दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठा महासंघाचा स्तुत्य उपक्रम; नानवीज प्रशिक्षण केंद्राला ३५० झाडांची भेट

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व सामाजिक बांधिलकी या भावनेतून अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड शहर व तालुका...

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला… गळ्यावर वार झाल्याने पत्नी गंभीर जखमी, दौंड शहरातील डिफेन्स कॉलनी...

  ✍️अख्तर काझी दौंड: शहरातील बंगला साईड( डिफेन्स कॉलनी) परिसरात एका विवाहित महिलेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली....

दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचे बांधकाम रेंगाळले; नागरिकांची गैरसोय नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरही नागरिकांचे प्रश्नचिन्ह….

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहरातील सार्वजनिक मुतारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, शहरातील नागरिक, व्यापारी तसेच महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे....

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

error: Content is protected !!