Homeसामाजिकजिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर एमबीबीएस; कु. नेहा रामचंद्र सोनोने यांचा नगरसेविका...

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर एमबीबीएस; कु. नेहा रामचंद्र सोनोने यांचा नगरसेविका स्वाती सावंत यांच्या हस्ते गौरव

वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के

दौंड | वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी एमबीबीएस पदवी यशस्वीरीत्या संपादन करून कुटुंबासह दौंड शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. नेहा रामचंद्र सोनोने यांचा नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

यावेळी नगरसेविका स्वाती निलेश सावंत, माजी नगरसेवक उत्तम सोनवणे, मारुती औरंगे, शामसुंदर सोनोने, राजू मोकाशी,रतन बोधे, सामाजिक कार्यकर्ते निलेश सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कु. नेहा सोनोने यांना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी तिच्या कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करत पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नगरसेविका स्वाती सावंत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय डोळ्यासमोर ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर एमबीबीएससारखी पदवी प्राप्त करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशा यशस्वी तरुणी समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतात. शिक्षणाच्या माध्यमातून मोठे ध्येय गाठण्यासाठी आत्मविश्वास, परिश्रम आणि संयम किती महत्त्वाचे आहेत, याचे उत्तम उदाहरण नेहा सोनोने यांनी घालून दिले आहे.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आता समाजाच्या आरोग्यसेवेत योगदान देण्याची संधी त्यांच्यासमोर उभी आहे. भविष्यात एक संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष डॉक्टर म्हणून रुग्णसेवेत मोलाची भूमिका बजावत समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

या सत्कार सोहळ्यास कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहा सोनोने यांच्या यशामुळे केवळ त्यांच्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण दौंड शहराचाही गौरव झाला असून, त्यांच्या या यशस्वी वाटचालीमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड शहर नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान बंड यांची निवड

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड शहर नाभिक संघटनेची नवीन कार्यकारिणी निवडण्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी भगवान (आप्पा) बंड यांची एकमताने...

दौंड शहरामध्ये वृद्ध महिलेचा निर्घृण खून…. आरोपींनी महिलेचे शीर छाटून फेकून दिले। दौंड पोलिसांनी...

  ✍️ अख्तर काझी दौंड: शहरातील संत मदर तेरेसा, नगर मोरी चौक परिसरातील आर बी वन येथे एका वृद्ध महिलेचा अतिशय निर्घृण पणे खून करण्यात आल्याची...

कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणी रोहित राजेश पाटील यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; महाराष्ट्र शासनाला नोटीस

  ✍️ संदिप बारटक्के दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या ३० जून २०२६ रोजीच्या निर्णयाला आव्हान...

सर्वोच्च न्यायालयात रोहित राजेश पाटील यांच्या याचिकेवर नोटीस. महाराष्ट्र शासनाला उत्तर दाखल करण्याचे...

  ✍️ अख्तर काझी दौंड : दौंड नगरपरिषदेचे नगरसेवक रोहित राजेश पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीच्या उच्च न्यायालयाच्या निकाला विरुद्ध सुप्रीम कोर्टात प्रकरण दाखल झाले...

AISMA पुणे मंडळाच्या सचिवपदी दिनेश रवींद्र कांबळे यांची दणदणीत निवड

  वृत्तवेध मarathi नेटवर्क दौंड : ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या (AISMA) पुणे मंडळाची दोन वर्षांची वार्षिक महासभा (AGM) १६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे उत्साहात...

error: Content is protected !!