✍️संदिप बारटक्के
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाचा ३६ वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दौंड शहराध्यक्ष शशांक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सलग तीन दिवस राबविण्यात आलेल्या उपक्रमांना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
२४ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करून सेवाभावाचा संदेश देण्यात आला. २५ जुलै रोजी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर २६ जुलै रोजी मतिमंद मुलांना खाऊ व अल्पोपहाराचे वाटप करून त्यांच्यासमवेत आनंद साजरा करण्यात आला.
या सामाजिक उपक्रमांमध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर, मिशन हॉस्पिटलचे डॉ. पी. बी. पवार, सामाजिक कार्यकर्त्या नीनाताई जोसेफ तसेच भाऊराव थोरात यांच्या हस्ते विविध कार्यक्रम पार पडले. उपस्थित मान्यवरांनी समाजातील वंचित आणि गरजू घटकांप्रती संवेदनशीलता जपत अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात यांनी पक्षाच्या स्थापनेपासून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी पक्षाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. समाजहिताचे उपक्रम हेच पक्षाचे खरे बळ असल्याचे सांगत भविष्यातही अशाच लोकाभिमुख कार्यक्रमांद्वारे जनसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला दौंड शहराध्यक्ष शशांक गायकवाड, संजय आयरेल्लू, दिगंबर रिकीबे, अभय भोसले, राष्ट्रपाल शिरसाट, अनिकेत रणसिंग, सागर गुंडेलू, सनी गायकवाड, अजय सावंत, गौतम सोनवणे, उज्ज्वल सुर्वे, प्रवीण पोळ, दिशा सचिन खरात, अजित भालेराव यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) दौंडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि गरजूंप्रती सेवाभाव या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रमांमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) चा ३६ वा वर्धापन दिन आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस पुणे जिल्हाभर उत्साहपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमाने साजरा झाला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















